आपण कोरोना व्हायरस बद्दल अज्ञान असल्यामुळे कोरणा व्हायरस पसरत आहे. – डॉ. संजय नाकाडे
हिंगोली : येथील औंढा रोड येथील ए.बी.एम. इंग्लिश हाय स्कुल मध्ये कोरोना व्हायरस बद्दल माहिती प्रतिबंधात्मक उपाय व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी हिंगोलीतील नांमाकीत डॉ. संजय नाकाडे, प्राचार्य जोसेफ के.जे., अध्यक्ष दिलीप बांगर सह सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये डॉ. संजय नाकाडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत आरोग्य हि महत्वाचे आहे असा सल्ला देऊन कोरोना व्हायरस बद्यल माहिती दिली. हा कोरोना व्हायरस काय आहे, तो कुठुन आला, त्याचे लक्षण, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, उपचार, आदी बद्दल माहिती दिली.
त्यांनी पुढे सांगितले सर्दी, खोकला, ताप या बद्दल सांगुन डेग्यु, बर्ड फ्लू हे जसे संसर्गजन्य आजार आहेत. तसाच कोरोना देखील आहे. परंतु हा डासापासुन न पसरता रुग्ण खोकलातांना, शिंकतांना रुग्णाजवळील असलेल्या इतर व्यक्तीना हवेतून व रुग्णाचा स्पर्श झालेल्या वस्तुच्या स्पर्शातून पसरत आहे. हा व्हायरस चीन देशातील वुहान येथून पसरुन आज भारतामध्ये आलेला आहे. कोरोना व्हायरस असलेला रुग्ण खोकल्यावर, शिंकल्यावर हवेत तुषार उडतात हे तुषार रुग्णाकडून हवेत पसरतात व या तुषारातील कणामध्ये विषाणू असतात आजूबाजूच्या व्यक्तीनी श्वास घेतल्यास त्यातुन त्यांचा संसर्ग होतो तसेच रुग्णाच्या खोकल्यातून काही तुषार वस्तुवर पडतात व त्या वस्तुनां आपल्या हाताचा स्पर्श झाल्यास ते विषाणु हातांना चिकटतात, त्या नंतर हात चेहऱ्याला , डोळयाला किंवा नाकाला लावले तर ते आपल्या श्वसनमार्गातून जाऊन जलद गतीने संसर्ग होतो. हा संसर्ग ज्या रुग्णाला होतो त्यांची सामन्य लक्षणाबददल माहिती दिली जसे सर्दी होणे, घसा तीव्र दुखणे, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे , डोकेदुखी असे या आजाराचे लक्षणे आहेत जर हा वाढला तर ताप येणे, धाप लागणे, छातीत दुखणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, नखे निळसर काळी पडणे व पुढे वाढला तर ह्रदय, किडनी वर परिणाम पडु शकतात. काही व्यक्तीमध्ये रोग प्रतिकार शक्ती चांगली असेल अशा व्यक्तीना या व्हायरसचे काहीही लक्षण जाणवणार देखाील नाहीत, परंतु अशा व्यक्तीमार्फत हा व्हायरस पसरु शकतो. आदी माहिती डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना दिली. हा आजार लहान मुले, वयोवृध्द माणसे तसचे रोगप्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तीना लवकर होण्याची शक्यता असते. तसेच यासाठी त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय सांगितले. मास्कचा वापर करावा, मास्क कसे बांधावे हे देखील त्यांनी बांधुन दाखविले. शिंकतांना, खोकलतांना रुमाल आदीचा वापर करावा, हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावे, नाकाला, तोंडाला हात लावणे टाळावे, इतर व्यक्तींना हात मिळविणे टाळावे, पुर्ण शिजविलेले अन्न खावे, आदी माहिती दिली. आजाराची काही शंका आल्यास घाबरुन न जाता डॉक्टरांना भेटून डॉक्टरांचा सल्ला व उपचार घ्यावे. असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
आपल कोरोना व्हायरस बद्दल अज्ञान असल्यामुळे कोरोना व्हायरस जलद गतीने पसरत आहे तेव्हा आपण दक्षता घेऊन आपली काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले. या वेळी डॉ. संजय नाकाडे यांनी विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराबाबत व कोरोना व्हायरस बददल प्रश्नोत्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरामुळे डॉक्टरांनी विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक केले.
संस्थाध्यक्ष दिलीप बांगर यांनी शाळेमध्ये अधिकचे हॅन्डवॉश उपलब्ध करुन देण्याचा डॉक्टरांना शब्द देऊन आभार व्यक्त केले.