हिंगोली : येथील औंढा रोड येथे असलेल्या ए.बी.एम. हाय इंग्लिश स्कुल मध्ये गणित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी पुणे येथील गणिततज्ञ श्री. गुलशन बेलदारे यांची मार्गदर्शक म्हणुन उपस्थिती होती. संस्थाध्यक्ष दिलीप बांगर, प्राचार्य जोसेफ केजे, प्राचार्य अनुरितेश यांच्या सह संपुर्ण शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती व सर्व विद्यार्थ्यांसह पालकांची या कार्यशाळेस उपस्थिती होती.
प्राचार्य जोसेफ के.जे. यांनी प्रमुख अतिथीचा विद्यार्थ्यांना व पालकांना परिचय करुन दिला. पुणे येथुन आलेले गणित तज्ञ श्री गुलशन बेलदारे यांचे स्वागत अध्यक्ष दिलीप बांगर यांनी केले. या कार्यक्रमासाठी चारशेहुनी अधिक पालकांची सह गणित विषयात अडचणी असतील अशा आपल्या पाल्यासह शहरवासीयांची हि उपस्थिती होती. तसेचे इतर शाळेच्या गणित विषय शिक्षकांची हि या कार्यशाळेस उपस्थिती होती.
कार्यक्रमााचे प्रास्ताविक शाळेचे शिक्षक श्री आदेश बोराळकर सरानी करुन गणित कार्यशाळेस सुरवात झाली. या कार्यशाळेत श्री. गुलशन बेलदारे सर यांनी विद्यार्थ्यांना तथा जमलेल्या पालकांना मागदर्शन केले. गणित विषय अवघड का जातो या बददल कारणे शोधून तसेच विद्यार्थी व पालकांकडुन जानून घेऊन त्याचे निराकरण केले. तसेच गणित हा विषयाचे महत्व समाजवून सांगितले. गणित हा विषय घोकमपट्टी करुन आकलन होणारा नाही तर तो समजून घ्यावा लागणारा आहे असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना गणित समजण्याच्या पदधती बददल त्यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वेगवेगळया वयात बोद्धीक वाढ होते. जो विद्यार्थी पाचवी मध्ये अभ्यासात कच्चा असेल तो सहावी – सातवी मध्ये प्रगती करुन शकतो. पालकांनी आपल्या पाल्यावर जबरदस्ती करुन नये किंवा त्याच्याकडे जास्तीच्या अपेक्षा ठेवू नये. विद्यार्थ्यांना प्रोसेस मध्ये शिकु दया असा सल्ला त्यांनी या कार्यक्रमामध्ये पालकांना दिला. पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष दयावे व त्याचा अभ्यास घ्यावा. दैनदिन जिवनातून गणित शिकता येते व पालकांने विद्यार्थ्यांना व्यवहारातून शिकवत जावे जसे की साठ रुपये लिटर ने दुध घेतो तर पासष्ठ रुपयाचे दुध विकत घेऊन किती दुध जास्त येईल या बाबत विद्यार्थ्यांना प्रश्न दयावेत. बस चे दोन तिकाटाचे अडतीस रुपये होतात तर तीन तीकीटाचे किती रुपये होतील. 70 किमी प्रवासासाठी दोन तास लागतात तर 50 किमी प्रवासासाठी किती वेळ लागेल. अशा दैनिदिन व्यवहारातील प्रश्न विद्यार्थ्यापुढे मांडावे व सोडवून घ्यावेत. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्हिजवलायजेशन करुन शिकवावे जेणे करुन त्यांना ते लवकर आकलन होईल या बददल त्यांनी मार्गदर्शन केले.
तसेच श्री बेलदारे सर यांनी आपल्या कार्यशाळेत संख्या, वर्ग, घन, घनमुळ, वर्गमुळ, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, पुर्णाकं, अपुर्णांक, सरासरी, टक्केवारी, नफा-तोटा, गुणोत्तर, भुमीतीमध्ये कोन, त्रिकोन, वर्तळ, चौकोन आदी बददल परिपुर्ण मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट क्लियर करुन दिल्या. विविध गणिती स्पर्धा परिक्षेबददल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गणित विषयांची गरज व महत्वा त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरे विचारत शिकवित असताना विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तराबददल त्यांनी आंनद व्यक्त करुन शाळेतील त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले. त्यांनी मत व्यक्त केले की पुणे येथे आलेल्या अठ्ठाविस वर्षाच्या मुलांना हि जे येत नाही ते येथील चिमुकले मुले उत्तरे देत आहेत.
पालकांना प्रश्नोत्तरेाच्या सत्रामध्ये पालकांनी श्री बेलदारे संराना विद्यार्थ्यांच्या गणित विषयातील अडचणी सह फाऊडेंशन कोर्स, बायज्युस, अबॅकस, ऑनलाईन लर्नींग, युटयुब लर्निंग आदी विषयावर प्रश्न केले त्यांची त्यांनी पालकांचे समाधान होईल असे उत्तरे देऊन पालकांचे समाधान केले. विद्यार्थ्यांचा मेंदुची वाढ होईल असे सर्व काही करा असे सांगुन त्यांनी मेंदुची वाढ कशी होईल या बददल मार्गदर्शन केले. कोणत्याही क्षेत्रामध्ये जायचे असेल तर विद्यार्थ्यांचे गणित, विज्ञान, इंग्रजी हे तीन विषय परिपुर्ण असायलाच पाहिजे असे त्यांनी सांगितले. पालकांना आपल्या पाल्यावर कोणत्याही गोष्टी लादू नये असे त्यांनी सांगितले इजिनियरींग व मेडीकल यांच्याही पलीकडे जग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आवड ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला करीअर करु दया असा सल्ला त्यांनी पालकांना दिला.
अध्यक्ष दिलीप बांगर यांच्या समारोप भाषणानंतर कार्यशाळेची सांगता करण्यात आली.