हिंगोली : येथील औंढा रोड वर असलेल्या ए.बी.एम. इंग्लिश हायस्कुल ला सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. रविंद्र धायतडक साहेब यांनी भेट दिली. या वेळी संस्थाध्यक्ष दिलीप बांगर यांनी सत्कार करुन स्वागत केले.
सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. रविंद्र धायतडक साहेब यांनी शाळेची, विद्यार्थ्यांची तथा संस्था पदाधीकारी यांची माहिती विचारुन संस्थेचे तथा शाळेचे आर्थिक व्यवहाराची तपासणी केली. शाळेमध्ये असलेल्या सि. व्ही. रमण विज्ञान प्रयोगशाळा, दिवाकर ग्रंथालय, मेघ मल्हार संगीत रुम, तांडव नृत्यालय, बाब आमटे मेडीकल रुम, संगणक प्रयोगशाळा, शाळा इमारत, मैदान, खेळाचे साहित्य, मल्लखांब आदी गोष्टीची पाहणी करुन शाळेच्या सुविधेबाबत आनंद व्यक्त केले. मल्लखांब या खांबाकडे पाहुन सध्या पंतप्रधान मोदीजी पण मल्लखांब खेळाला पुरस्कृत करीत असल्याचे बोलले.
शाळा सि.बी.एस.ई. मंडळाशी संलग्न झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. शाळेच्या अभिप्राय पुस्तकामध्ये उत्कृष्ठ शाळा शेरा देऊन शाळेच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.